जून महिन्यापासून म्हणजे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात आघाडीवर आहे, कोरोना नाही; महाराष्ट्र सरकार आणि अर्णब गोस्वामी वाद. अर्णबने सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अक्षरशः वेठीस धरले. कंगना रणावत आणि संजय राऊत यांचे शाब्दिक युद्ध आणि त्या नंतर मुंबई महानगरपालिकेने केलेली घाईने कारवाई हे उदाहरण समोर असताना, अर्णबची अटक म्हणजे प्रसिद्धीसाठी आयते कोलीत हातात देणे असे आहे.
सध्या प्रसिद्धीचे एक मोठे माध्यम आहे. ते म्हणजे सोशल मीडियावर जर तुमचा ट्रेंड चालू असेल, मग तो वाईट, नकारात्मक का असेना, तुमची चर्चा चालू असेल तर तुम्ही प्रसिद्ध झालात म्हणून समजा. मध्ये चहा-बिस्कीट असा वाद ओढावून मराठी मीडियाने रिपब्लिकच्या पत्रकाराला मारहाण केली, आणि नंतर स्वतः चहा-बिस्कीटचे फोटो टाकून स्वतः च हस केलं. मुंबई महानगरपालिकेने प्राथमिकता देऊन कंगनाचे ऑफिस तोडले आणि माध्यमातून दाखवून दिले, की सरकार विरुद्ध बोलल्याने काय केले जाते. पण शेवटी न्यायालयाने मुंबई महानगर पालिकेला दोन शब्द सुनावले आणि कंगनाला सहानुभूती मिळून ती प्रसिद्ध झाली. आज नेमके हेच झाले.
महाराष्ट्र ज्यांनी अनेक वर्षे आपल्या राजकीय कौशल्याने चालवला, त्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, उद्धव ठाकरे. म्हणजेच सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. त्यांनी राजकारण करावे, परंतु कळोची नेदावे ही शिकवण अंगिकरणे फार गरजेची आहे. आज त्यांनी तात्काळ अर्णबवर कारवाई केली आणि त्याला अलिबाग न्यायालयाकडून पोलीस कोठडी नाकारण्यात आली. कदाचित त्याला आता जामीन मिळेल. आणि आज जो त्याच्या विरोधकांनी केलेली त्याची कुप्रसिद्धी ही उद्या त्याचा यशस्वी काळ ठरेल. कारण दोन वर्षाआधीचे प्रकरण आज अचानक समोर आणून त्याच्या अभिव्यक्तीवर केलेली गळचेपीच होती. हे ना महाराष्ट्र सरकार नाकारू शकत ना पक्षीय समर्थक.
अर्णबची प्रश्न विचारण्याची पद्धत चुकीची असेल, पण त्याने तावातावाने मांडलेले प्रश्न मात्र विचार करण्यासारखेच होते. त्याने खुलेपणाने सरकारला आवाहन केले. आणि सरकारने चुकीच्या पद्धतीने ते स्वीकारले. एक असा काळ होता, ज्यावेळी अर्णब भाजप विरोधात होता. पण मोदी-शहा यांच्या चतुराईने आज अर्णबला भाजपचा समर्थक आहे. काहीवेळा प्रश्नांना उत्तर शांतपणे द्यावी लागतात, जी सध्या महाराष्ट्र सरकार देत नाहीये. एकतर अनुल्लेखाने त्याचे महत्त्व कमी करा नाहीतर राजकारण करावे...बाकी तुम्ही सुज्ञ आहात.
ही झाली प्रकरणाची एक बाजू, दुसऱ्या बाजूसाठी लवकरच भेटू.
- नेहा जाधव.
0 Comments