काल एका हिंदी भाषिक काकांकडे कामानिमित्त जाणे झाले. ते फरसाणचे मोठे व्यापारी आहेत. काही विषयांवर चर्चा करताना त्यांनी म्हंटले, की महाराष्ट्रातील मुली या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही एडजस्ट करून राहू शकतात. पण, महाराष्ट्र बाहेरून येणाऱ्या मुली ज्यावेळी मुंबईत पाऊल ठेवतात, त्यावेळी त्यांची एडजस्ट करण्याची तयारी नसते. त्यांना मोठ्या घरात राहण्याची सवय असल्याने त्या जास्त काळ टिकू शकत नाहीत. पण, महाराष्ट्रीयन, मराठी मुली या जन्मजातच कष्टाळू असतात. त्यांना तुम्ही लहान खोली जरी दिली तरी त्या स्वतः चा संसार फुलवू शकतात. कारण ही माती त्यांना कष्ट करायला शिकवते. इतर मुली मेहनती आहेत, त्यात शंका नाही. पण सर्वात जास्त कष्टाळू महाराष्ट्रातील मुली आहेत. आमच्या मुली एडजस्ट करत नाहीत.
0 Comments