स्त्री वैमानिक करवाचौथ करते, कारण - It's her choice

हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे, ज्यामध्ये सण, उत्सव अनेक आहेत. आता आपला दिवाळी सण येत आहे. बाजारात लगबग सुरू आहे. अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत, तर अनेकजनांची याच सणामुळे घरात भरभराट होणार आहे. असाच एक सण स्त्रियांसाठी पवित्र असणारा होऊन गेला, ज्याचे नाव आहे करवाचौथ. हा सण भारताच्या हिंदी भाषिक समाजात साजरा केला जातो. तो सण कसा साजरा करतात हे सर्वांना ठाऊकच आहे. दिल्ली येथे स्थित असलेले वैमानिक जोडपे गौरव तनेजा आणि त्यांची पत्नी रितू राठी-तनेजा. अत्यंत प्रसिद्ध असलेले हे दांम्पत्य. त्यांचे 'फ्लाईंग बिस्ट' नावाचे युट्युब चॅनल आहे. करवाचौथच्या सुरुवातीला त्यांनी काही रितू यांचे शॉपिंगचे व्हिडीओ पोस्ट केले होते. पण, ज्या दिवशी करवाचौथ होते त्यावेळी गौरव यांनी आपल्याला फार छान संदेश त्यातून दिला. ते सुरुवातीला म्हणाले, की जर कोणीही तुम्हाला म्हणत असेल की नाही करवाचौथ करू नका, त्यात तुम्हाला समानता सांगत असेल तर त्या व्यक्तीला सांगा भाई it's her choice. आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा आपल्याला गर्वच असला पाहिजे. 

गौरव तनेजा आणि त्यांची पत्नी हे दोघेही उच्च शिक्षित आहेत. दोघेही वैमानिक आहेत. आणि त्यांना फॉलो करण्याचे अजून एक कारण म्हणजे ते दोघेही आपल्या धर्मातील प्रत्येक गोष्टीचे फार छान प्रकारे पालन करतात. ते नेहमी राहणी पाश्चात्य ठेवली तरी देखील आपल्या मुलीवर संस्कार करतात आणि इतरांनाही छान शिकवण देतात. ते जे काही करतात, त्या मागची ते कारणे देखील देतात. करवाचौथ सण देखील का केला जातो याची छान माहिती त्यांनी दिली होती. आणि याच स्वभावामुळे त्यांना लाखो लोकं पाहतात आणि फॉलो करतात.

गेल्या चार-पाच वर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय. कोणताही हिंदू सण आला, की हे करू नका ते करू नका. होळी आली की जल प्रदूषण आठवते, दिवाळी आली की वायू प्रदूषण जागा होतो आणि गणपती आले की ध्वनी प्रदूषण. मान्य आहे, की काही लोकं अतिरेक करतात पण प्रदूषण आणि ज्या कोणत्याही वाईट गोष्टी समाजात घडतात त्याला जबाबदार केवळ हिंदू धर्म. पण याच हिंदू धर्माच्या सण, विधी, पूजा अशा अनेक गोष्टीमुळे भारतच काय इतर देशात सुद्धा उदरनिर्वाह होतो हे मात्र धर्माला केवळ विरोध करायचा म्हणून सतत समोर उपदेश दिले जातात. त्याबाबत काही उदाहरणे पाहुयात.

दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर आहे. घाटकोपर हे मोठ्या बाजारामध्ये गणले जाते. मुंबईमध्ये घाटकोपर किंवा अन्य कोणत्याही मोठ्या बाजारापेठात कपडे विशेष करून स्त्रियांच्या कपडयांचे बाजारपेठ हे मुस्लिम समाजातील व्यक्ती चालवतात. आणि हिंदू व्यक्ती गरिब व्यक्तीसुद्धा वर्षातून दिवाळीला कपडे खरेदी करतोच करतो. शिवाय बाहेरील देशाचा विचार केला, तर सगळ्यात जास्त दिवे, लाईटिंग हे चीनची उत्पादने असतात. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे जर कोणी तुम्हाला म्हणत असेल, की हिंदू सण साजरे करू नका तर धार्मिक विषय जरी बाजूला ठेवला तरी आपण अनेकांचे उदरनिर्वाह करतो, म्हणून हिंदू सण मोठ्या थाटात साजरे केलेच पाहिजे.


लिहिताना, गणपती उत्सवामधील एक गंमत आठवली. गणपतीचे मखर सोशल मीडियावर विकणाऱ्या व्यक्तीने आपला फायदा झाल्यावर गणपतीला अत्यंत खालच्या दर्जाच्या शिव्या दिल्या. पण ज्यावेळी त्याचे सत्य समोर आले, त्यावेळी मात्र त्याने तोंड लपवले. त्यामुळे कोणीही सांगत असेल, की सण साजरे करू नका, तर त्यांना निष्ठून सांगा, आम्ही काय करायचं ते आम्हाला शिकवू नका. बाकी येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा आणि कोणत्याही वस्तू खरेदी करताना उदा. दिवे हे गरिबांकडूनच विकत घ्या. जेणेकरून त्यांच्या घरात ही दिवा लागेल. 

- नेहा जाधव.

follow me - Facebook - https://www.facebook.com/JadhavNeha Facebook page - https://www.facebook.com/nehadiario Instagram - https://www.instagram.com/reporter_madam Twitter - https://www.twitter.com/NehaJad03549392

Post a Comment

0 Comments