एकदा घरी
परतण्यासाठी ठाणे स्टेशनवरुन धावतच अंबरनाथ ट्रेन पकडली. वेळ
सातची म्हणजे भरमसाठ गर्दीची. आणि त्यात महिला डब्बा म्हणजे सकाळी केलेला मेकअप
घरी जाईपर्यंत कसा सुकतो आणि मग घरी जाण्यासाठी तो पुन्हा कसा ओला(मस्करीत) करायचा
या चर्चेपासून माझ्या नवर्यापासून तिच्या नवऱ्यापर्यंत अशा जगभरातील गप्पांचा
कालवाकालव नुसता. त्यात आपण भलीमोठी पर्स घेऊन(महिलांची पर्स म्हणजे जगभरात कोठे
काही मिळणार नसेल, तर ते त्यांच्या पर्समध्ये मिळते.) जागा बनवून आपले केस मागचीच्या
तोंडात न जाऊ देता; आपल्या पर्सचा पुढचीला त्रास न होऊ देता एका जागी स्थिर उभे
राहायचे. मी बाई आपली जागा बनवून उभी राहिले. त्या गर्दीत एका आवाजाने सर्वांचे
लक्ष वेधले. माझ्या आजुबाजूच्या बायका त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागल्या. नेहमी
धक्का आणि जागेवरून झालेली ती भांडणे नक्की नव्हती. म्हणून मी ही त्या दिशेने पाहू
लागले. आणि जे पुढे झाले, ते आम्हा सर्व तरुणीसाठी लाजिरवाणी गोष्ट होतीच, पण
त्याहून अधिक प्रेरणादायी नक्कीच होती.
एक सत्तर वयीन, सावळी, लाल नववारी साडी नेसलेली आजी एका फेरीवाल्याला मारत होती. मोठ-मोठ्याने काहीतरी ओरडत होती. त्या सगळ्या गोंधळात कळवा स्टेशन आले. गाडी थांबली. अन तिने त्या दारुड्याला गाडीतून जोरात बाहेर ढकलले. तो थेट कळवा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पडला.
सगळ्यांना उत्सुकता होती; नेमके झाले काय? आजीना काहीजणींनी विचारणा केल्यावर सुरू झाली तिची पराक्रमी कथा. ती आजी नाहूरला मेथीची भाजी घेण्यासाठी चढली. तिच्या मागून फणी विकण्याच्या बहाण्याने एक चाळीस वयीन दारुडा चढला. मुलुंड ते ठाणे जशी गर्दी वाढत होती, तस तसा हा त्या गर्दीतून बायकांना स्पर्श करत पुढे जात होता, किळसवाण्या नजरेने पाहत होता. अनेक बायकांना समजले... त्यांनी कुठून येतात गर्दीत, कशाला येतात, कशाला चढतात, नालायक, मूर्ख याशिवाय काहीच शब्द काढले नाहीत. ते पाहून आजींचा राग आवरेना झाला. तो जसा आजीजवळ आला, आजीने जोरात कानाखाली मारली, नाकातून रक्त येईपर्यंत झोडपले. आणि मग बाहेर ढकलून दिले.
तिने जे सांगितले, केले; ते ऐकून आनंद वाटला, अंगावर काटा आला. ती शूर आहे असे दिसले खरे; पण त्याहून जास्त वाईट तरुण मुलींचे वाटले. एखादीचा चुकून धक्का लागला, की मारामारी करणारी बाई समोर आपल्या अंगाला स्पर्श होताना शिव्यांवर निभावते. फेरीवाले गाडीत येणे काही चुकीची गोष्ट नाही. पण, त्यासाठी वेळ आणि तारतम्य हवेच. स्त्रियांनी आजींचा आदर्श घेऊन स्वतः शूर होणे आजच्या 'लोकल' आयुष्याची गरज आहे.
-नेहा सुनिल जाधव.
(हा प्रसंग फार जुना आहे. लेख शेअर करताना नावाशिवाय लेख शेअर करू नये.)

1 Comments
अगदी खरंय!शेवटचा परिच्छेद 👌
ReplyDelete