नमस्कार,
प्रवास...प्रवास
म्हंटले, की मुंबईकर - ठाणेकर - नवी मुंबईकर यांच्या डोळ्यासमोर येतो, तो धक्के
खात, रोज उशिरा ऑफिसला पोचवणारा, काही वेळा रडवणारा, काही वेळा त्याहून जास्त
हसवणारा, वाईट गुण दाखवणारा, सगुण शिकवणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले
आयुष्य घडवणारा रेल्वेचा - ट्रेनचा प्रवास. माझ्या आयुष्यात मी तेरावीला(पत्रकारिता)
कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ट्रेन आली. तिने गेल्या पाच वर्षात मला खूप धक्के
दिले, पाडले, आजारी केले आणि त्याहून जास्त मला घडवले. मी लहानपणापासून लिहित
असली, तरीही रेल्वेच्या प्रचंड गर्दीतूनच...रोज डोळ्यांना दिसणारी हजारो माणसे,
त्यांची सुख-दु:खे, लोकांचा पोटासाठी पाठीवर चालेला प्रवास, लोकांचा संघर्ष पाहून
माझे लिखाणही घडले. तेच लिखाण फेसबुकवर केल्यावर अनेकांनी मला ब्लॉग आणि व्लॉंगचे
पर्याय दिले. त्या सूचनांना धरून चार
महिन्याआधी मी युट्युब चनल सुरू केले. पण, पत्रकारिता पेशा असल्याने त्याकडे
दुर्लक्षच झाले. येत्या नव्या आंग्ल वर्षात ती थांबलेली गाडी पुन्हा रूळावर येईलच.
पण, तत्पूर्वी 'नेहा'ज डायरी नावाने ब्लॉगची नवी गाडी सुरू करत आहे. माझ्या
लिखानाला दररोज फेसबुकवर जसा भरून प्रतिसाद देता, तसाच माझ्या नव्या ब्लॉगला ही
द्यालच. यात शंका नाही.
हा ब्लॉग केवळ माझे
लिखाण नसून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दु:खाची सांगड घालणाऱ्या कथा असतील.
जीवनात धडपडणाऱ्या 'लोकलकरांच्या' आयुष्याचा माग घेणारा हा प्रवास असेल. चला तर मग
माझ्यासोबत तुम्हीही प्रवासी बनून आपला प्रवास निरंतर चालू ठेवूया.
- नेहा सुनिल जाधव.
0 Comments