तेव्हा हिंदी भाषिकही म्हणतील, आम्हाला अभिमान आहे मराठी कलाकारांचा..!!!



माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या. 

नेहा जाधव 

हल्ली लोकांच्या भावना दुखावणे हीच सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. म्हणजे देशात गरीबी, बेरोजगारी या समस्या देखील भावनेपुढे फिकया आहेत. अशीच एक गोष्ट गेल्या दोन दिवसांत घडली. सुशांतसिंग प्रकरणात अख्खी बॉलीवूड इंडस्ट्री हैराण करून सोडणाऱ्या कंगना रनौतने खासदार संजय राऊत यांना एका ट्विटला उत्तर देताना म्हंटले, की मुंबई काही पीओके आहे का? तर तुम्ही मला धमकी देत आहात? आता या उत्तराला तिने मुंबईला पीओके म्हंटले हा तर्क काढणाऱ्यासाठी तर एकवीस तोफाची सलामी. पण, या वाहत्या गंगेत काही मराठी कलाकर देखील उतरले. गेले अनेक वर्ष मुंबईच्या समस्यांवर न बोलणारे अचानक मराठी अस्मितेच्या बाता करू लागले आहेत. आणि काही विरोधक जे साधे भाजी घेताना, रस्ता दाखवताना नव्हे नव्हे तर ज्या ठिकाणाहून मराठी अस्मितेच्या बाता मारत आहेत त्या ठिकाणी आपले नाव आणि आपले टायपिंग साधे मराठी ठेवू शकत नाहीत, मराठीत बोलू शकत नाही अशांनी मराठी अस्मिता दाखवणे म्हणजे आश्चर्यच नाही का?

पत्रकार कसे बनाल???

जे मराठी कलाकार मुंबई मेरी जान(हे देखील हिंदीत बरे का!) म्हणून, मराठी अस्मिता, आणि मराठी बाणा दाखवून कंगनाला विरोध करत आहेत, त्यांची आज अचानक मराठी अस्मिता जागी झाली आहे. जसे महापुरुषांची जयंती आली, की आपल्यातला अनुयायी जागा होतो तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी जागी झालेली त्यांची अस्मिता मुंबई डुबत होती तेव्हा जागी झाली नाही. असेही त्यांनी मुंबईकरांना मनोरंजना शिवाय दिले तरी काय? आणि हे मनोरंजन देखील फुकट देत नाहीत. त्याचे जे पैसे मिळतात ते प्रेक्षकच देतात. त्या जागेवर पोहचण्यासाठी कलाकार महिलांना किती लोकांची दारे ठोठावी लागतात. हे जर चुकीचे वाटत असेल तर यावर त्यांनी स्वतः चालवलेले कास्टिंग काऊचचे व्हिडीओ पहावे. जेव्हा नाना पाटेकर यांच्यावर घाणेरडे आरोप झाले त्यावेळी मराठी बोटावर मोजनारे कलाकार सोडून बाकी कलाकार कुठे होते? तेव्हा मराठी स्वाभिमान नव्हता का? त्यावेळी का नाही मराठी अस्मिता जागी झाली? सुशांतसिंग प्रकरणात कुठे होती मराठी कलाकार मंडळी?? एका मराठी अभिनेत्याने आत्महत्या केली. त्यावेळी का नाही तुम्ही मराठीपणा जपला? त्या मराठी अभिनेत्याच्या डिप्रेशनचे कारण का नाही जाणून घेतले?  काही इतिहास आणि वर्तमानातील होतकरू दिग्दर्शक सोडले, तर मराठी इतिहास, मुंबईच्या समस्या, महाराष्ट्रमधील समस्या यावर कोणाची मराठी अस्मिता जागी होत नाही. सई ताम्हणकर, रेणुका शहाणे यांचे मराठीसाठी योगदान काय? मराठी टिकविण्यासाठी त्यांनी आजतागायत काय केले आहे? हिंदी कलाकारांसोबत लग्न करून, हिंदी सृष्टीत स्थान मिळवून तुम्ही स्वतः ला कर्तृत्ववान समजता का? तर ही डोळ्यावरची पटले काढून टाका. मराठी अस्मिता ही महाराष्ट्र जगभरात गाजवणार्या लोकांमुळे मुंबईत टिकून आहे. इथे हजारो समस्या आहेत. कुर्ला, सायन भाग जरा जाऊन पहा. तिथे वाढणारे अवैध भोंगे हटवण्यासाठी मराठी कलाकारांनी आवाज उठवला का? सोनू निगमला किती लोकांनी पाठींबा दिला? इथे मंदिरे जमीनदोस्त झाली, आणि दुसरीकडे नव्या मशिदी उभारल्या जातात. त्यावेळी मराठी माणसाचे प्रेम कुठे गेले? 



आज कंगनाला मिळणाऱ्या वागणुकीमुळे तिने म्हंटले मला मुंबईमध्ये असुरक्षित वाटत आहे. त्याचे कारण तिच्या नावाने रस्त्या रस्त्यावर घाणेरडे लागलेले स्टॅम्प आहे. तिच्या वक्तव्यामागे ठोस कारणे आहेत. पण मराठी कलाकार मंडळी जरा सांगा हो, अमिर खानच्या बायकोला जी मुंबईत राहत होती तिला मुंबई आणि  भारतात असुरक्षित वाटले त्यावेळी तुम्हाला मुंबई पोसत नव्हती का? तुमचा आवाज फुटत नव्हता का? तेव्हा मराठी अस्मिता नव्हती आता जागृत झाली का? जेव्हा महाराष्ट्रमध्ये पोलिसांवर हल्ले झाले तेव्हा कुठे गेले होते मराठी आणि महाराष्ट्र पोलिसांवरचे प्रेम? जेव्हा पालघर साधू हत्याकांड झाला त्यावेळी कुठे गेली होती अस्मिता? जेव्हा मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान विनोदी कलाकार करतात तेव्हा कुठे जातो तुमचा स्वाभिमान? आज ज्या कंगनाचे बिकनी फोटो तुम्ही फिरवत आहात, तसेच फोटो मुंबई मेरी जान म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे देखील आहेत. ती अभिनेत्री संस्कारी आणि ही हरामखोर? तिकडे संस्कृती, संस्कार कुठे जातात?

समाज 34000 शेतकरी आत्महत्येवर केव्हा बोलणार?

साध्या मराठी पारितोषिक वितरण कार्यक्रमात मराठी गाण्याला दुय्यम दर्जा देणाऱ्या मराठी कलाकारांनी तरी आपण मराठीचा स्वाभिमान बाळगतो असे म्हणू नये. तुमची मुले शिकता इंग्रजी माध्यमात, तुमची मुले शिकतात दिल्लीमध्ये. तुम्ही मुंबईत असून देखील बॉलीवूडला दर्जा, मान तुमच्यापेक्षा जास्त. चला हवा येउद्या सारख्या कार्यक्रमात सलमान खान, अमीर खान या मंडळीसाठी स्पेशल कार्यक्रम होतात. स्वाभिमान तुम्हाला आहे आणि तो सर्वाना आपल्या मायभूमीसाठी असलाच पाहिजे. पण जिथे गरज आहे, तिथे आजतागायत ना निषेध झाला ना कधी तुम्ही मदत केली. मराठी शाळा टिकाव्या यासाठी कष्ट घेणाऱ्या  सुमित राघवन यांच्या पत्नी चिन्मयी सुर्वे या माझ्या नजरेतले सर्वोत्कृष्ट उदाहरण आहेत. भले त्यांनी राघवन सारख्या हिंदी तरुणासोबत लग्न केले. पण मराठीची नाळ तिने सोडली नाही. असे मराठी कलाकार जेव्हा निर्माण होतील, मराठी वाढवण्यासाठी, मराठी अस्मितेसाठी बॉलिवूडचा काळा बाजार मुळापासून मुंबईतून फेकून द्याल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रच नाही केवळ मराठीजन नाहीत तर हिंदी भाषिक गर्वाने बोलतील आम्हाला अभिमान आहे मराठी कलाकारांचा!  

-nehajadhav690@gmail.com


Post a Comment

4 Comments