रमजानच्या दिवशीच तलवारीने हत्या करण्यात आली म्हणून ही शोकयात्रा.. पण हिंदूना संभाजी महाराजांच्या अंत्ययात्रेसाठी आमंत्रण द्यावे लागते


२१ मार्च रोजी मुंबई येथे शिया मुस्लिमांचा लाखों संख्येने जुलूस निघाला. ही एक प्रकारची प्रतिकात्मक अंत्ययात्राच होती. त्याचे कारण प्रेषित मुहम्मद (स.अ.व.) यांचे चुलत भाऊ आणि जावई आणि शिया इस्लामचे पहिले इमाम इमाम अली यांची इ.स. ६६१ मध्ये रमजानच्या दिवशीच तलवारीने हत्या करण्यात आली. त्यांनी दोन दिवसांनी जीव सोडला. त्यांच्या या मृत्यूला धाडसाचे प्रतीक मानून त्यांचा जुलूस निघतो. 


या दिवशी सुमारे १,००,००० लोकं शोक करत जैनबिया इमामबारगाहपासून आणि इमामिया मशिदीकडे दुःख व्यक्त करत जातात. काळ्या पोशाखात   शोकगीते (मर्सिया आणि नोहास) पठण करतात, इमाम अली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात. 


यासाठी ना कोणत्याही प्रकारचे आमंत्रण असते. आपल्या श्रद्धेसाठी लोकं एकत्र येतात. इस्लामची ही गोष्ट अनुकरणीय आहे खरं तर. नाहीतर आपण हिंदू.. पूर्वजांच्या बाबतीत अत्यंत करंटी पिढी. पूर्वजांच्या मृत्यूचे दाखले मागणारी पिढी. महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळा म्हणून लोकांना सांगावे लागते. एवढेच नव्हे तर हे वाचून धर्माची टिंगल करणारे देखील हिंदुच आहेत. 


धर्मवीर संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे केले. त्यांची अंत्ययात्रा देखील निघाली नाही. परंतु, श्री शिवप्रतिष्ठान त्यांच्या स्मरणार्थ जी अंत्ययात्र काढते त्यासाठी देखील कितीतरी परवानग्या घ्यावा लागतात.. त्यासाठी देखील हिंदूना आमंत्रण द्यावी लागतात...हे दुर्दैव नाहीतर अजून काय?


- नेहा रोहित तांबे 


Post a Comment

0 Comments